Women Cricket Team Accident : शुक्रवारी (21 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास महिला क्रिकेट संघाची  (Women's cricket team बस ट्रकला धडकल्याची घटना विशाखापट्टणमच्या (Visakhapatnam) ज्ञानपुरममध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'या अपघातात खेळाडू आणि प्रशिक्षक असे एकूण चारजण जखमी झाले आहेत.  वृत्त आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपचारानंतर सर्व जखमी खेळाडू बडोद्याला (Vadodara) गेले आहेत.


अपघातानंतर समोर आलेल्या घटनास्थळाच्या फोटोंमधून बसचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये बसचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. बसचा पुढचा भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला असून या घटनेची माहिती देत बसचे फोटो एएनआयने ट्वीट करत पोस्ट केले आहेत. 






विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी उपचारानंतर सर्व खेळाडू शुक्रवारी सायंकाळी बडोदाकडे रवाना झाले. विशाखापट्टणमच्या ज्ञानपुरममध्ये महिला क्रिकेट संघाच्या बसचा हा अपघात झाला. अपघात झालेल्या संघाच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सध्या वरिष्ठ महिला T20 ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. दरम्यान  बडोदा आणि सौराष्ट्र संघांचा सामना 20 ऑक्टोबर रोजी डॉ. पीव्हीजी राजू एसीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विजयनगरम (आंध्र प्रदेश) येथे खेळवण्यात आलां. त्या सामन्यात बडोद्याने 7 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर संघ पुन्हा परतत असताना हा सामना घडला.


टीम इंडियाने जिंकला आशिया कप


भारतीय महिला संघाचा विचार करता त्यांनी नुकतंच सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंका संघाचा आठ विकेट्सनं पराभव केला. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संघाला फक्त 66 धावाच करता आल्या. प्रत्युत्तर दाखल भारतानं हे आव्हान दोन गडी आणि 8.3 षटकांमध्ये सहज पार केलं. रेणुका सिंह (Renuka Singh), राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांच्या भेदक माऱ्यानंतर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं आशिया चषक उंचावला


हे देखील वाचा-


WI vs IRE T20 WC 2022 : सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेता संघ यंदा सुपर 12 पूर्वीच स्पर्धेबाहेर, वेस्ट इंडीजचा आयर्लंडकडून 9 विकेट्सने पराभव