T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतून वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या फेरीतून बाहेर झाला आहे. सुपर 12 च्या सामन्यात एन्ट्री मिळवण्यासाठी ग्रुप स्टेजच्या 3 पैकी 2 सामन्यात विजय अनिवार्य होता, पण वेस्टइंडिज संघाने 2 सामने गमावल्यामुळे ते स्पर्धेबाहेर झाले आहेत. दरम्यान 2010 आणि 2012 टी20 विश्वचषक असे सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणारा संघ स्पर्धेबाहेर झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिज संघाने त्यांचा स्टार ऑलराऊंडर शिमरॉन हेटमायरला फ्लाईट वेळेत न पकडल्याने स्पर्धेबाहेर केलं होतं आणि तो नसताना स्पर्धेतही वेस्ट इंडिजने खराब कामगिरी केल्यामुळे हेटमायरही फॅन्सना आठवला असून त्यासंबधित मीम्सही तुफान व्हायरल होत आहेत. यातील काही मजेशीर मीम्स पाहू...






















आयर्लंडकडून वेस्ट इंडिज पराभूत


नुकत्याच झालेल्या ग्रुप B मधील सुपर 12 साठी पात्रता फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने आयर्लंडवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ दोन पराभवांसह स्पर्धेबाहेर झाला आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत वेस्ट इंडिजने 146 धावा केल्या ज्याचा पाठलाग करताना आयर्लंडने केवळ एक गडी गमावत 17.3 षटकांत 150 धावा केल्या. अनुभवी पॉल स्टर्लिंग याने नाबाद 66 तर लॉर्कन टकरने नाबाद 45 धावांची दमदार भागिदारी यावेळी केली.  


...म्हणून ड्रॉप केलं शिमरॉनला


ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकाला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना वेस्ट इंडीजनं शिमरॉन (Shimron Hetmyer) हेटमायरला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. शिमरॉन हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी जाणारं विमान चुकवलं. संघाचं नियोजित विमान शनिवारी (1 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार होतं. परंतु, शिमरॉनच्या कौटुंबिक कारणांमुळं हे विमान सोमवारी उड्डाण भरणार असल्याचं बोर्डानंकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र, तरीही तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकला नाही. याच कारणास्तव वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं त्याला विश्वचषक संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला होता.