Team India ready for IND vs PAK Match : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु झाली असून आता ग्रुप स्टेजचे सामना संपून सुपर-12 सुरु होणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार असून समोर पाकिस्तानचा संघ (IND vs PAK) असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी मजा-मस्ती करत फोटोशूट केलं असून या सर्व मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हिडीओमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते. या फोटोशूटमध्ये भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन (R Aswhin) भारतीय कर्णधार रोहितची नक्कल करताना दिसला. तर अनुभवी फलंदाज विराट कोहलीही कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देताना दिसला. टीम इंडियाच्या या फोटोशूटचा व्हिडिओ T20 वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून फोटोशूट पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 


पाहा VIDEO -






23 ऑक्टोबरला महामुकाबला


भारत आणि पाकिस्तान दोघांनी आपले सराव सामने खेळले असून भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी मात दिली तर पाकिस्तानचा संघ मात्र इंग्लंडकडून 6 विकेट्सनं पराभूत झाला. त्यानंतर दोन्ही संघाचे दुसरे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिले. यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी झाली पण पाकिस्तानचा डाव सुरु होताच पावसाने हजेरी लावली. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाच पावसामुळे सुरु होऊ शकला नाही. आता दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. या सामन्याने दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात करतील. या दोन्ही संघांमधील गेल्या वर्षभरातील हा चौथा सामना असेल. गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने दोनदा, तर भारतीय संघाने एकदा विजय मिळवला आहे.


टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.


हे देखील वाचा-


WI vs IRE T20 WC 2022 : सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेता संघ यंदा सुपर 12 पूर्वीच स्पर्धेबाहेर, वेस्ट इंडीजचा आयर्लंडकडून 9 विकेट्सने पराभव