Wishes on Sachin Tendulkar's 50th Birthday : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. भारतातीलच नाही तर जगभरातील चाहत्यांकडून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयुष्याचं अर्धशतकं पूर्ण केलं आहं.  या खास प्रसंगी त्याचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सचिनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडीओ त्यान ट्विटरवर शेअर केला आहे.


वीरेंद्र सेहवागने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो शीर्षासनामध्ये सचिन तेंडुलकरला शुभेच्छा देताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने म्हटलं आहे की, ''मैदानावर तुम्ही जे सांगितलं, नेहमी त्याच्या उलटच केलं आहे. त्यामुळे आज तुमच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त उलटा होऊन शीर्षासन करत तुम्हांला शुभेच्छा देत आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...   पाजी, आप जिओ हजारों साल, साल के दिन हो एक कोटी.''


पाहा व्हिडीओ : 






भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सचिनला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.










 


 






 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'हे' पाच विक्रम मोडणं अतिशय कठीण, याच्याजवळ एकही फलंदाज नाही