Sachin Tendulkar 50th Birthday : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक सचिन तेंडुलकरचा आज 50 वाढदिवस आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला आणि पाहता-पाहता 5.5 फुट उंच मुलगा ठरला 'क्रिकेटचा देव' ठरला. सचिनचं भारतीय क्रिकेटमधील योगदान वादादीत आहे. सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अमूल्य योगदान आहे. संपूर्ण जगात सचिनला क्रिकेटचा देव मानलं जातं. सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आहेत. या विक्रमांची बरोबरी केवळ त्याच्यापेक्षा प्रतिभावान, कठोर परिश्रम करणारा आणि भाग्यवान खेळाडूच मोडू शकतो.


सचिन तेंडुलकरनं पूर्ण केलं आयुष्याचं 'अर्धशतक'


मराठी कवी, कादंबरीकार आणि साहित्यिक रमेश तेंडुलकर आणि रजनी यांच्या घरी 24 एप्रिल 1973 रोजी सचिनचा जन्म झाला. साहित्यिकांच्या घरातील सचिन क्रिकेटपटू झाला हे जणू भाग्यच. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने त्याची खेळातील प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे छत्रछायेखाली नेलं. पुढे हेच आचरेकर सर सचिनचे गुरू, मार्गदर्शक आणि मार्गदर्शक बनले. सचिन जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या महान फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याला आता 10 वर्षे झाली आहेत आणि आज हा दिग्गज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. 


साडे पाच फुट उंच मुलगा कसा ठरला 'क्रिकेटचा देव'


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा सचिन तेंडूलकर जगातील एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 75 शतकं झळकावली आहेत. याशिवाय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 463 सामने आणि कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे.






क्रिकेट खेळातील महान खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या आहेत. 


सोशल मीडियावर चाहत्यांकडून सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतं आहे.