बारबाडोस :  भारतानं रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्त्वानं टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024) विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 धावांनी पराभव करत भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला. विराट कोहलीनं (Virat Kohli) अंतिम फेरीच्या लढतीत 76 धावांची महत्त्वाची खेळी केली.  विराट कोहली यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. कालच्या टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये  एका बाजूनं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत यांच्या विकेट गेल्या होत्या. आफ्रिकेनं मॅचवर वर्चस्व मिळवलं होतं. विराटनं अक्षर पटेलच्या साथीनं 72 धावा करत भारताचा डाव सावरला. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला अन् विराट कोहलीच्या नावावर अनोखा इतिहास नोंदवला गेला. विराट कोहलीच्या नावावर आयसीसीच्या चार स्पर्धांचं जेतेपद आहे. 


विराट कोहलीनं इतिहास रचला


विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं 2008 चा आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर विराट कोहलीनं आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2011 च्या टीम इंडियाच्या संघाचा सदस्य होता. विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम फेरीच्या लढतीत दमदार कामगिरी केली होती.  भारतानं श्रीलंकेला पराभूत करत  2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. 1983 नंतर भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2011 ला भारतानं वनडे वर्ल्ड कप जिंकला. यावेळी महेंद्रसिंह धोनी भारताचा कॅप्टन होता. 






2013 ला भारतानं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा जिंकली होती. विराट कोहली त्या संघाचा देखील सदस्य होता. भारतीय संघाला 2013 नंतर जवळपास 11 वर्ष आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद मिळालं नाही.  अखेर 11 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. विराट कोहलीच्या 76 धावा या विजयात देखील महत्त्वाच्या ठरल्या. 


विराट कोहलीची निवृत्ती 


विराट कोहलीनं आयसीसी टी20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मोठा निर्णय घोषित केला. आजची मॅच ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी 20 मॅच होती, असं म्हटलं. आयसीसीच्या चार स्पर्धांचं विजेतेपद मिळवणारा विराट कोहली एकमेव खेळाडू टरला आहे. विराट कोहली अंडर 19 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् टी 20 वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. 


संबंधित बातम्या : 


Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन


 IND Vs SA : देवाला साकडं, मैदानात शांतता अन् हार्दिकच्या हातात चेंडू, शेवटच्या षटकातला अंगावर काटा आणणारा बॉल टू बॉल थरार!