Virat Kohli Retirement : विराट कोहलीने सोमवार 12 मे रोजी त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला निरोप दिला. विराटने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही साध्य केले आहे. 2011 मध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीपासून 2025 मध्ये निवृत्तीपर्यंत त्याने 123 कसोटी सामन्यांमध्ये 9230 धावा केल्या, जे 10000 पेक्षा 730 धावा कमी आहेत. 

Continues below advertisement


एकेकाळी त्याने ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता, पण इतक्या जवळ येऊन ठेपल्याने निवृत्त होणे थोडे आश्चर्यकारक आहे. विराट फक्त 36 वर्षांचा आहे आणि त्याच्या फिटनेसचे जगभर उदाहरण दिले जाते, मग त्याने निवृत्ती का घेतली? काही प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान आता एक बातमी समोर येत आहे की, विराट कोहलीने कर्णधारपदाची मागणी केली होती. पण प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही अशा खेळाडूंचा संघ हवा आहे, ज्यांच्यासोबत ते दीर्घकाळ काम करू शकतील.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान कोहलीला भारतीय संघाचा भाग बनवायचे होते. बोर्डाने कोहलीला निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याची विनंती केली होती. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि धावांसाठी भुकेला आहे, असे एनडीटीव्हीने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थिती संपूर्ण संघाचे मनोबल वाढवते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्याला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. पण त्याने कसोटी कर्णधारपदाची मागणी केली.


कोहलीने कर्णधारपदाची केली होती मागणी!


या सगळ्यामध्ये टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयकडे कसोटी कर्णधारपदाची मागणी केली होती. पण, बोर्डाने ते नाकारले कारण त्यांना आता एका युवा खेळाडूकडे संघाची धुरा द्यायची आहे. शुभमन गिलला पुढचा कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते असे मानले जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे नवीन चक्र सुरू होणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही अशा खेळाडूंचा संघ हवा आहे ज्यांच्यासोबत ते दीर्घकाळ काम करू शकतील. भारताने गेल्या दोन महत्त्वाच्या कसोटी मालिका गमावल्या आहेत.


टीओआयच्या अहवालात पुढे म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कोहलीने त्याच्या सहकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले की कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीची कामगिरी खराब राहिली, त्याने पाच कसोटी सामन्यात एका शतकासह फक्त 190 धावा केल्या. त्याच्या निर्णयामागील कारण फॉर्ममध्ये घसरण किंवा बीसीसीआयने कसोटी कर्णधारपद सोपवण्यास नकार दिला हे या अहवालात स्पष्ट झालेले नाही.