South Africa Squad WTC Final 2025 : 2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यासाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हा सामना 11 ते 15 जून दरम्यान इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. डोपिंगमुळे नुकतीच बंदी घालण्यात आलेला कागिसो रबाडा संघात परतला आहे, तर संघाचे नेतृत्व टेम्बा बावुमा करेल.

Continues below advertisement

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीत दुखापतीतून परतलेला लुंगी एनगिडीचाही समावेश आहे. मार्को जॉन्सन, कॉर्बिन बॉश आणि विआन मुल्डर हे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसतील. मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा असा विश्वास आहे की त्यांचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पूर्णपणे तयार आहे, त्यात कोणतीही कमतरता नाही. 

2023-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने एकूण 12 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 8 सामने जिंकले आणि 69.44 गुणांची टक्केवारी गाठली. दक्षिण आफ्रिका, टेबल टॉपर असल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

कागिसो रबाडावर घालण्यात आली होती बंदी...

डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कागिसो रबाडावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली होती. चौकशीत असे दिसून आले की त्याने SA20 लीगपूर्वी कोकेनचे सेवन केले होते. याच कारणास्तव, तो आयपीएल 2025 मध्येच सोडून घरी परतला. ड्रग टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली होती, चांगली गोष्ट म्हणजे तो WTC फायनलसाठी संघात परतला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Squad WTC Final 2025)

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, टोनी डी जियोर्गी, डेव्हिड बेडिंगहॅम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, मार्को जॉन्सन, कागिसो रबाडा, काइल व्हेरेन, डेन पॅटरसन, वियान मुल्डर, रायन रिकेल्टन. 

हे ही वाचा -

Virat Kohli-Premanand Ji Maharaj : कसोटीमधून निवृत्ती घेताच विराट कोहली अनुष्कासोबत प्रेमानंद महाराजांच्या चरणी; पाया पडत म्हणाला...

Shahid Afridi Viral Video : गिरे तो भी टांग ऊपर, भारताविरोधात तोंडावर आपटल्यानंतरही शाहिद आफ्रिदीची विजयी रॅली, भारतीय सैन्याबाबत म्हणाला...