एक्स्प्लोर

Virat kohli Test Cricket: इंग्लंडमध्येच असलेला विराट कोहली पॅड बांधून टीम इंडियासाठी मैदानात उतरणार? टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय फिरवणार?

Ind Vs Eng Test series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाची चर्चा

Ind Vs England Test series: टीम इंडियाची रनमशीन आणि आपल्या आक्रमक नेतृत्त्वाने भारतीय क्रिकेट संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघातील (Team India) आपले स्थान डळमळीत आहे, हे लक्षात आल्याने विराट कोहली याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वाखालील अत्यंत नवखा भारतीय संघ इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर कसा तग धरणार, असा प्रश्नही उपस्थित झाला होता. त्यानंतर शुभमन गिलने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये खणखणीत फलंदाजी करत आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, लॉर्डसच्या मैदानावर टीम इंडियाने हातातला सामना गमावल्यानंतर गिलच्या नेतृत्त्वाच्या शैलीबद्दल आणि क्षमतेविषयी पु्न्हा प्रश्न उपस्थित झाले होते. अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मदन लाल यांनी विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. (Team India on England tour)

लॉर्डस कसोटीत भारतीय संघ जिंकेल असे वाटत असतानाच फलंदाजांच्या हाराकिरीमुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली होती. ही गोष्ट मदन लाल यांच्या मनाला चांगलीच लागली आहे. त्यांनी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे, अशी विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात काहीही गैर नाही. विराट कोहलीने पुन्हा भारतीय कसोटी संघात येऊन युवा खेळाडूंना त्याच्या अनुभवाचा फायदा करुन दिला पाहिजे. तसेच खेळाप्रतीची निष्ठा काय असते, हे शिकवले पाहिजे, असे मदन लाल यांनी म्हटले.

विराट कोहली याची भारतीय क्रिकेटविषयी असलेली जी समर्पण वृत्ती होती, त्याचा तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही. त्याने भारतीय कसोटी संघात पुन्हा यावे, ही माझी इच्छा आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात काहीही गैर नाही. त्याने इंग्लंडच्या दौऱ्यातच भारतीय संघात यावे, असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्याने पुढील कसोटी मालिकेत भारतीय संघात यावे, असे मला वाटते. विराट कोहली आणखी एक ते दोन वर्षे कसोटी क्रिकेट सहजपणे खेळू शकतो. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, हा माझा दृष्टीकोन आहे. तुम्ही अनुभवातून शिकलेल्या गोष्टी संघातील युवा खेळाडूंना सांगणे, ही गरजेची गोष्ट आहे. पण विराट अचानक कसोटी संघातून बाहेर पडला. अजूनही उशीर झालेला नाही. कृपया परत ये, अशी विनंती मदन लाल यांनी विराटला केली आहे. यावरआता विराट कोहली आणि बीसीसीआय गांभीर्याने विचार करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

करुण नायरला आणखी एक संधी देणार की बाहेरचा रस्ता दाखवणार? जसप्रीत बुमराहबाबतही मोठा निर्णय घेणार

महत्त्वाच्या बातम्या

Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget