मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. अनुष्का आणि विराट आई-बाबा बनणार आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या तमाम चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सोबतच दोघांचा फोटोही शेअर केला आहे, ज्यात अनुष्का गरोदर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.






"अॅण्ड देन, वी वर थ्री... अराईव्हिंग जानेवारी 2021," असं लिहित विराट आणि अनुष्काने गुडन्यूज शेअर केली. यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


2017 मध्ये विरुष्काचं लग्न
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं होतं. विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झालं.