साउथॅम्पटन : इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा अँडरसनने पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो चौथा गोलंदाज आहे.


पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी अँडरसनने अजहर अलीला बाद केलं आणि आपली 600 वी विकेट साजरी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या जेम्स अँडरसनने वेस्टइंडीज आणि त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात अँडरसनने पाच विकेट घेतले, तर दुसऱ्या डावात त्याने दोन विकेट घेतल्या आहेत.





आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथा खेळाडू


मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 800 विकेट
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 विकेट
अनिल कुंबळे (भारत) - 619 विकेट
जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 600* विकेट


जेम्स अँडरसनची कसोटी कारकिर्द


सामने- 156
डाव - 291
विकेट्स- 600
सरासरी- 26.81