India vs Zimbabwe Live Streaming: भारत- झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात रोहित शर्मासह (Rohit Sharma) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ज्यामुळं भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचे नेतृत्व केएल राहुलच्या (KL Rahul) हाती आहे. तर शिखर धवन (Shikhar Dhawan) उपकर्णधार असेल. तर झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व क्रेग इर्विनच्या अनुपस्थितीत रेजिस चकाब्वाच्या (Regis Chakabva) हाती असेल. 


केएल राहुलनं यावर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच भारतीय संघाचं जबाबदारी खांद्यावर घेतली होती. या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. याच दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. 


कधी, कुठे पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्टला गुरूवारी खेळवला जाईल. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. याच्या अर्ध्यातासपूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता. 
 
संघ-


भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.


झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.


हे देखील वाचा-


Vinod Kambli: विनोद कांबळी आर्थिक संकटात, कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शोधतोय नोकरी


IND vs ZIM: शिखर धवनसोबत सलामीला कोणाला पाठवावं? मोहम्मद कैफनं सुचवलं धाकड फलंदाजाचं नाव!