Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आशिया चषकानंतर पुन्हा फॉर्मत परतलाय. तेव्हाासून कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. पण 2020 ते सप्टेंबर 2022 पर्यंत विराटच्या करिअरमधील वाईट काळ होता. या काळात विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. कर्णधारपदही गेले होते. चारीबाजूने टीका होत होती. या वाईट काळातून बाहेर येण्यासाठी त्याने दोन महिन्यांची विश्रांतीदेखील घेतली होती. त्यानंतर त्याने नव्या जोमाने फलंदाजीचा श्रीगणेशा केला. आशिया चषकात (Asia Cup) त्याने शतक झळकावत करिअरमधील 71 वं शतक पूर्ण केले. या एका शतकासाठी विराट कोहलीला जवळपास दोन वर्षाचा कालावधी लगला होता. पण या शतकानंतर काय वाटले.. अन् काय झाले.. याचा अनुभव विराट कोहलीने नुकताच सांगितला.
नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीने 71 व्या शतकवेळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विराटने म्हटले की, 'माझं शतक पूर्ण होण्याआधी मला जाणवले की माझ्याकडे वेळ आहे, मी आता 94 वर आहे, आणि कदाचित माझं शतक होऊ शकतं, आणि दुसऱ्याच क्षणी मी षट्कार मारला आणि माझं शतक पूर्ण केलं. त्यानंतर जाणवलं या गोष्टीसाठी मी दोन वर्ष रडत होतो? '
विराटनं सांगितलं की, 'ज्याक्षणी हे सगळं झालं त्याच्या दुसऱ्या क्षणाला ते सगळं संपलं. कारण ते पूर्णवेळ राहणार नव्हतं. मी माझं शतक पूर्ण केलं तो क्षण मी आयुष्यभर जगेन त्यानंतर मी खूप हसलो. मला हे असंच नेहमीसारखं हवं होतं.'
'आणि अनुष्काशी बोलताना रडलो'...
विराटने शतक झळकावल्यानंतर पहिल्यांदा अनुष्काला फोन केला. अनुष्कासोबत बोलताना विराट कोहली भावनिक झाला होता. शतक झळकावल्यानंतर डोळ्यात अश्रू होते का ? या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला की, 'मी त्या क्षणाला नाही पण अनष्काशी फोनवर बोलताना रडलो. '
71 व्या शतकानंतर, कोहलीची बॅट तळपतेय. 296 धावांसह 2022 च्या T20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही तो झाला. स्पर्धेदरम्यान, त्याने पाकिस्तान विरुद्ध 53 चेंडूत 82* धावांची खेळी खेळली ज्यामुळे भारताला एक असंभाव्य विजय नोंदवण्यात मदत झाली.
“माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण असेल,”
विराट कोहलीच्या नावावर 46 एकदिवसीय सामन्याती शतके आहेत. तर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी करण्यापासून तो फक्त तीन शतके दूर आहे. यावर विराटने म्हटले की, 'जर तेंडुलकरचा विक्रम मोडण्यात यशस्वी झालो तर तो आयुष्यातला सर्वात भावनिक क्षण असेल'.
विराटने त्याच्या 71 व्या शतकानंतर आणखी चार आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगच्या (71 शतके) शतकांना मागे टाकले आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 75 शतके आहेत.