Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गेल्या अडीच वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराटला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट 2019 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचं झळकावलं होतं. तेव्हापासून तो खराब फॉर्मशी झुंज देतोय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला मागील पाच सामन्यात फक्त 59 धावा काढत्या आल्या आहेत. विराट मागील पाच एकदिवसीय सामन्यात 8,18,0,16 आणि 17 धावा करून माघारी परतलाय


नकोशा विक्रमापासून विराट कोहली क्वचित दूर
भारत आणि इंग्लंड यांच्यात काल (17 जुलै 2022) मँनचेस्टरच्या ओल्ड ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर अखेरचा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यातही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद होणार आहे. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं, ज्याला 19 ऑगस्ट 2022 मध्ये 1000 दिवस पूर्ण होतील. 


वेस्ट इंडीज दौऱ्यात विराटला विश्रांती
इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेला येत्या 22 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटला आशिया चषकापर्यंत शतक ठोकण्याची संधी नाही. आशिया कप 27 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो. या स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. 


विराटची निराशाजनक कामगिरी
विराट कोहलीनं 2022 मध्ये 19 डावांमध्ये 25.05 च्या सरासरीनं 476 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 धावा आहे. कोहलीनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरही कोहली धावा काढण्यासाठी झगडत होता. मागील अडीच वर्षात त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलं नाही.


हे देखील वाचा-