Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत 1998 नंतर म्हणजेच 24 वर्षानंतर क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय. यावेळी महिला क्रिकेट संघाला संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेत खेळण्याची महिला क्रिकेट संघाची पहिलीच वेळ असेल. महत्वाचं म्हणजे, येत्या 28 जुलै 2022 पासून 8 ऑगस्ट 2022 पर्यंत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत 72 देशातील जवळपास 4 हजार 500 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. या स्पर्धेत क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत- पाकिस्तान (IND vs PAK) एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत.
या स्पर्धेतील क्रिकेटचा पहिला सामना 29 जुलै 2022 रोजी खेळला जाईल. क्रिकेटचे सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. क्रिकेटमधील सुवर्ण आणि कांस्य पदकासाठी 7 जुलैला सामने खेळले जातील. कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघाची घोषणआ करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 31 जुलै 2022 रोजी एकमेकांशी भिडतील. भारताचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर, स्मृती मानधनावर उप- कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आठ संघाची दोन गटात विभागणी
यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 8 महिला संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली. या ग्रुपमधील टॉप-2 संघ सेमीफायनलसाठी क्लालिफाय करतील. त्यानंतर दोन्ही संघात सुवर्णपदकासाठी लढत होईल.
'अ' गट | 'ब' गट |
भारत | इंग्लंड |
पाकिस्तान | न्यूझीलंड |
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका |
बारबाडोस | श्रीलंका |
कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया भाटिया (WK), यास्तिका भाटिया (WK), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
हे देखील वाचा-