ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं पाच विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेवर नाव कोरलं. भारताच्या विजयात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात न्यूझीलंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढासळली. परंतु, ऋषभ पंतनं हार्दिक पांड्यासोबत मोठी भागेदारी करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. या शतकीय कामगिरीसह ऋषभ पंतनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. आशियाबाहेर शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय विकेटकिपर ठरलाय.
ऋषभ पंतची खास विक्रमाला गवसणी
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं सर्वात प्रथम 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आशियाबाहेर शतक झळकावलं होतं. त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर भारताचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर केल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध 2020 मध्ये शतक केलं होतं. त्यानंतर आशियाबाहेर शतक ठोकणाऱ्या ऋषभ पंत तिसरा भारतीय विकेटकिपर आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अशी कामगिरी करून दाखवली आहे.
आशियाबाहेर शतक झळकावणारे भारतीय विकेटकिपर
भारतीय विकेटकिपर | धावा | विरुद्ध संघ | वर्ष |
राहुल द्रविड | 145 | श्रीलंका | 1999 |
केएल राहुल | 112 | न्यूझीलंड | 2020 |
ऋषभ पंत | 100* | इंग्लंड | 2022 |
भारतानं एकदिवसीय मालिका जिंकली
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्या ऋषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला.
हे देखील वाचा-