Year Ender 2024 Cricketers Retirement नवी दिल्ली : 2024 या वर्षात क्रिकेट चाहत्यांसाठी जितकं चांगलं राहिलं तितकंच दु:ख देणारं राहिलं. कारण दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेटला बाय बाय केलं. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानं देशातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. मात्र, त्याचवेळी रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या सारख्या दिग्गजांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांना देखील धक्का बसला. 2024 मध्ये कोणत्या कोणत्या क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली ते जाणून घेऊयात.
2024 मध्ये आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा नंतर ऑलराऊंडर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
भारतीय क्रिकेट संघाच्या इतर क्रिकेटपटूंनी देखील निवृत्ती जाहीर केली. यामध्ये सलामीवीर शिखर धवन, विकेटकीपर दिनेश कार्तिक, विकेटकीपर रिद्धीमान साहा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर शिखर धवन नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. दिनेश कार्तिकनं निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
कोणत्या विदेशी खेळाडूंनी निवृत्ती घेतली
भारतीय क्रिकेटपटूंशिवाय विदेशी खेळाडूंनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं देखील निवृत्ती घेतली. आयपीएलच्या 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये देखील अँडरसनचं नाव होतं, मात्र त्याला कोणत्या टीमनं खरेदी केलं नाही.
इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अली, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर आणि टीम साऊथीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम यानं 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोघांनी देखील टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं.
इतर बातम्या :