Rishabh Pant: भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI 3rd T20I) यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Garden) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामने जिंकत भारतानं मालिकेत 2-0 नं आघाडी घेतलीय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर झालाय. यातच भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही वेस्ट इंडीजविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आलीय. एवढेच नव्हेतर, श्रीलंकेविरुद्ध आगामी टी-20 मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आलीय.


श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभची संघात निवड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढतीला कसोटी मालिकेनं सुरुवात होणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या टी-20 मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलीय. परंतु, दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत त्याची संघात निवड करण्यात आलीय. पंत गेल्या काही काळापासून सतत क्रिकेट खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. यामुळं बीसीसीआयनं त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय. 


भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर, पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील. जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. 


विराट कोहलीला विश्रांती
यापूर्वी बीसीसीआयनेही विराटला काही दिवस विश्रांती दिलीय. विराट कोहलीही विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये दिसणार नाही. त्यानं संघाचा बायो बबल सोडलाय. तो थेट 4 मार्चला श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत दिसणार आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha