Virat Kohli Break From Bio-Bubble: वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून विजय मिळवून वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका लागलाय. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाल्याची माहिती समोर आलीय. 


भारताला कोलकात्याच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. कोहलीला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून ब्रेक देण्यात आलाय, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलीय. विराट कोहलीनं वेस्ट इंडीजद विरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. 


वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीनं आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात विराट कोहलीनं 41 चेंडूत 52 धावा केल्या. दरम्यान, त्यानं मैदानाच्या चारही बाजूंनी फटके मारले. त्याचं तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


भारतानं दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजला 8 धावांनी पराभूत करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात विराट कोहलीसह युवा फलंदाज ऋषभ पंतनंही चांगली खेळी केलीय. त्यानं 28 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच्या अर्धशतकीय खेळीमुळं भारताला वेस्ट इंडीजसमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवता आलं. या सामन्यात ऋषभ पंतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आलाय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha