IND vs WI,  Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने अवघ्या आठ धावांनी रोमहर्षक असा विजय मिळवला आहे. चित्तथरारक झालेल्या सामन्यात काही काळासाठी वेस्ट इंडीजचा संघ जिंकेल असे वाटत होते, पण त्याच वेळी भारताने सामन्यात कमबॅक करत सामना आठ धावांनी जिंकला. यावेळी अनुभवी भुवनेश्वर कुमारने 19 व्या षटकात केवळ चार धावा देत विडींजची महत्त्वाची अशी पूरनची विकेट घेतली. ज्यामुळे भारताचा विजय जवळपास पक्का झाला. विशेष म्हणजे हा भारताचा शंभरावा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय आहे. 


वेस्ट इंडीजने गोलंदाजी निवडल्याने भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. दरम्यान भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत स्कोरबोर्डवर 186 धावा लावल्या. विराट आणि पंतने अप्रतिम अर्धशतक लगावलं. त्यानंतर विडींजकडून पूरन आणि पोवेलने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतकं लगावली. पण पूरन बाद झाल्यानंतर मात्र विडींजचा संघ विजयापर्यंत पोहचू शकला नाही.



असा झाला सामना


कोलकात्याच्या ईडन गार्डन (Eden Garden) मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजचा कर्णधार पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला आले. किशन 2 धावा करुन बाद झाला. तर रोहित 19 धावा करुन तंबूत परतला. पण विराट कोहली आज भल्यातच फॉर्ममध्ये दिसत होता. पण अर्धशतक पूर्ण होताच तो त्रिफळाचित झाला आणि 52 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारनेही 8 धावा केल्या. पण त्यानंतर पंत आणि व्यंकटेश यांनी धमाकेदार फलंदाजी करायला सुरुवात केली. अय्यर 33 धावा करुन बाद झाला. पण पंतने नाबाद अर्धशतक (52) झळकावत भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.


ज्यामुळे विजयासाठी विडींजला 187 धावांची गरज होती. विडींजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शेफर्ड आणि कॉट्रेल यांनी 1-1 विकेट घेतली. त्यानंतर भारताने गोलंदाजी करत पहिली विकेट लवकर घेतली. पण नंतर विडींजने सावध खेळी केली. नंतर पूरन आणि पोवेल यांनी दमदार अर्धशतक लगावली. पण 19 व्या षटकात अनुभवी भुवनेश्वरने केवळ चार धावा देत विडींजची महत्त्वाची अशी पूरनची विकेट घेतली. ज्यानंतर शेवटच्या षटकात हर्षलने 16 धावा दिल्या पण तरी देखील भारताला विजय मिळवता आला. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha