Virat Kohli Rested : भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून विशेष म्हणजे स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) हा देखील पुन्हा फॉर्मात परतल्याने टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान विराटसह सर्वच दिग्गज खेळाडू भारताला आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) दमदार फॉर्ममध्ये हवे असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. आता विराटला तिसऱ्या टी20 मध्येही न खेळवता विश्रांती देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्याजागी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी देणार असल्याचंही समोर येत आहे.

 

आशिया कप 2022 स्पर्धेत भारत खास कामगिरी करु शकला नाही. पण विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकत पुन्हा एकदा फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही विराटने चमकदार कामगिरी केली. पण विश्वचषकही आता जवळ आल्याने त्याला अधिक ताण न देण्याच्या हेतून संघ व्यवस्थापनाने विराटला तिसऱ्या टी20 मध्ये विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असावा. तसंच श्रेयस अय्यर हा विश्वचषकाच्या संघात राखीव खेळाडू म्हणून असल्याने त्याचा फॉर्म पाहण्याच्या दृष्टीने त्याला तिसऱ्या टी20 मध्ये विराटच्या जागी संधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे.

 

विराटच्या नावावर मोठा रेकॉर्ड


आशिया कपमधील शतकानंतर फॉर्मात परतलेल्या विराटनं आता विक्रमावर विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात विराटनं नाबाद 049 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान विराटनं एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटनं टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. विराटनं दुसऱ्या टी20 मध्ये 28 चेंडूत 175 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 49 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

  



हे देखील वाचा -