IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत दुसऱ्या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवत भारतानं मालिका खिशात घातलीय. दरम्यान, टी-20 मालिकेनंतर रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडू आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. तर, भारताचा 'ब' संघ दक्षिण आफ्रिकेशी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 6 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयनं रविवारी संघ जाहीर केलाय. या मालिकेत शिखर धवनकडं भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. तर, श्रेयस अय्यर उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळेल. याशिवाय अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आलीय. रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांचीही एकदिवसीय संघात निवड झालीय. पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवलेला मुकेश कुमार भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. 


मुकेश कुमार काय म्हणाला?
टीम इंडियात निवड झाल्यानंतर मुकेश कुमारला वडिलांची आठवण झाली. “मी भावूक झालो. मला सगळं अस्पष्ट वाटत होतं. मला फक्त माझे दिवंगत वडील काशीनाथ सिंह यांचा चेहरा आठवतोय. बंगालसाठी रणजी ट्रॉफी खेळल्यानंतर माझ्या वडिलांना मी क्रिकेटर असल्याचा विश्वास बसला.  मी सक्षम खेळाडू नाही, असा माझ्या वडिलांना माझ्यावर संशय होता. 


मुकेशनं सरकारी नोकरी करण्याची त्याच्या वडिलांची इच्छा 
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी मुकेश कुमारच्या वडिलांचं 'ब्रेन स्ट्रोक'नं निधन झालं. वडील आजारी असताना मुकेश सकाळी प्रॅक्टिसला जायचा आणि बाकीचा वेळ वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये घालवायचा. आईबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला, "आज माझी आईही खूप भावूक झाली. घरातले सगळं रडायला लागले." आपल्या मुलानं सरकारी नोकरी करावी, असं मुकेशच्या वडिलांची इच्छा होती. ज्यासाठी मुकेश कुमारन तीनवेळा केंद्रीय रिझर्व पोलीस दलाची परीक्षा दिलीय. परंतु, त्याची सीआरपीएफमध्ये त्याची निवड झाली नाही.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, अवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.


हे देखील वाचा-