Virat Kohli's Post for Anushka Sharma Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) वाढदिवस आहे. यानिमित्ताने पती विराट कोहलीने (Virat Kohli) तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहलीनं पत्नी अनुष्कासाठी भावनिक संदेश लिहित तिच्याबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे. यासोबतच विराट कोहलीने अनुष्काचे काही फोटोही शेअर केले आहेत. विराट आणि अनुष्काचे चाहते अनुष्काला वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. विराट आणि अनुष्कानं 2017 मध्ये लग्नगाठ बांधली, त्यांना एक मुलगी आहे.
विराट कोहलीचा अनुष्कासाठी खास पोस्ट
विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या 35 व्या वाढदिवसाला प्रेम व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये अनुष्काचे काही अनसीन फोटो पोस्ट करत विराट कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''सुख, दुख आणि तुझ्या सर्व गोंडस वेडेपणातून मी तुझ्यावर अमर्याद प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी सर्व काही.'' चाहते विराटच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत.
2017 मध्ये 'विरुष्का'नं बांधली लग्नगाठ
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. कोहलीनं 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता. त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. विराट कोहली हा क्रिकेटविश्वातील स्टार फलंदाज आहे. तर, अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या दोघांच्या चाहत्यांनी त्यांना 'विरुष्का' असं नाव दिलं आहे. या दोघांनी एक मुलगी असून तिचं नाव वामिका आहे.
विराट- अनुष्काची प्रेम कहाणी
कोहली आणि अनुष्का खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एका जाहिरातीच्या सेटवर या दोघांची भेट झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण सुरुवातीला त्यांनी आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, त्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. यानंतर विराट आणि अणुष्कानं डिसेंबर 2017 मध्ये इटलीत लग्न केलं. लग्न आटोपल्यानंतर भारतात परतल्यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यात आपल्या सर्व प्रियजनांना आमंत्रित केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :