Virat Kohli India vs New Zealand Test : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताचा पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला पुणे कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. किवी संघाने पहिल्या डावात 259 आणि दुसऱ्या डावात 255 धावा केल्या, तर भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 156 धावांत गडगडला. त्यामुळे भारताला 359 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले, पण न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज गारद झाले. टीम इंडिया दुसऱ्या डावात 245 धावांवर ऑलआऊट झाली आणि 113 धावांनी सामना गमावला.




न्यूझीलंडविरुद्धची ही तीन सामन्यांची कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट ठरली आहे. गेल्या सामन्यातील मोठ्या पराभवानंतर भारताकडून जबरदस्त पुनरागमन अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. पुणे कसोटीत अनेक खेळाडू फ्लॉप ठरले, त्यातील सर्वात मोठे नाव म्हणजे विराट कोहली, जो सामन्याच्या दोन्ही डावात काही विशेष करू शकला नाही. हा सामना कोहलीसाठी चांगला नव्हता. सलग दोन फ्लॉपनंतर विराट कोहलीचा संयम सुटला आहे ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




कोहली आऊट झाल्यानंतर किती संतापलेला दिसतो, हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना कोहलीने त्याच्या बॅट जोरात वॉटर बॉक्सवर मारली. यावेळी चाहते त्याला प्रोत्साहन देत होते. स्टँडवर उभे असलेले चाहते वारंवार 'हार्ड लक, हार्ड लक' म्हणत होते, पण कोहलीचा संयम सुटला होता.




न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने दोन्ही डावात केवळ 18 धावा केल्या. दोन्ही डावात कोहली डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरचा बळी ठरला. सॅन्टनरने पहिल्या डावात कोहलीला 1 धावांवर बोल्ड केले, तर दुसऱ्या डावात 17 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.


हे ही वाचा -


Team India WTC 2025 : बंगळुरू-पुणे कसोटीत माती खाल्ल्यानंतरही टीम इंडिया जाणार WTC फायनलमध्ये? करावी लागणार 'हे' काम, जाणून घ्या समीकरण


Ind vs Nz Test Series : कोचिंगचा कारभार गडबडलाय? खंबीर टीम इंडियाची 'गंभीर' अवस्था; आधी परदेशात अन् आता मायदेशात आली 'ही' वेळ