Gautam Gambhir Coaching Team India Lost Test Series : टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर राहुल द्रविडचा भारतीय मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याने टीम इंडियाचा कोचिंग प्रवास सुरू केला. त्याच्या प्रशिक्षणाखालील टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास वर-खाली राहिला आहे. गेल्या 36 वर्षात भारतात एकही कसोटी जिंकू न शकलेल्या किवी संघाने घरच्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव केला. यासह टीम इंडियाची विजयी मालिका घरच्या मैदानावर थांबली. याआधी भारतीय संघ 12 वर्षे आणि 18 मालिका सलग विजयाचा झेंडा फडकवत होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर त्याच्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. 




रोहित शर्मा आणि गौतम गंभीरसाठी आगामी काही आठवडे या पराभवाचे आकलन नक्की करतील, पण गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची ही दुसरी खराब कामगिरी आहे. गंभीरने कोचिंगमध्ये पदार्पण श्रीलंकेविरुद्ध केले. संघाने येथे टी-20 मालिका क्लीन स्वीप करण्यात यश मिळवले, परंतु वनडे मालिका 0-2 ने गमावली. 27 वर्षांनंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली. गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाचे हे पहिले अपयश होते.




श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची होती. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप केला. पण न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव झाला. आणि न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर टीम इंडियाविरुद्ध पहिला विजय मिळाला.




12 वर्षांनंतर गमावली मालिका


न्यूझीलंडने मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. अशाप्रकारे पाहिले तर गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली. त्यानंतर 36 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी गमावली आणि 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.


हे ही वाचा -


Ind vs Nz 2nd Test : 'मी तसा माणूस नाही जो...' सलग दुसऱ्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहितने कोणावर फोडले पराभवाचे खापर?


WTC 2025 Points Table : टीम इंडियाचा पराभव अन् पाकिस्तानच्या विजयानंतर बदलले WTC पॉइंट टेबल; फायनलची शर्यत झाली रोमांचक