BCCI General Manager: भारतामपा माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यावर काही आठवड्यांनंतर कुरुविला यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी धीरज मल्होत्रा ​​यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे महाव्यवस्थापक हे पद रिक्त होते. 


कोण आहेत अभय कुरुविला? 


53 वर्षीय कुरुविला हे 90 च्या दशकात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज म्हणून पुढे येत होते. परंतु त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. हा तो काळ होता जेव्हा भारतीय संघात वेगवान गोलंदाजांचा भीषण दुष्काळ होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या काळात कुरुविला यांनी 10 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कुरुविला यांनी 10 कसोटीत 35.7 च्या सरासरीने 3.03 च्या इकॉनॉमीने 25 विकेट घेतल्या होत्या. त्यांनी देशासाठी 25 एकदिवसीय सामने देखील खेळले, ज्यात त्यांनी 4.72 च्या इकॉनॉमीसह 25 विकेट घेतल्या. मुंबईचे खेळाडू असलेल्या कुरुविला यांनी 2000 साली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 






दरम्यान, 26 मार्चपासून आयपीएलच्या नवीन हंगामाला सुरूवात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. आयपीएल 2022 हा 15वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत.  


हे देखील वाचा-