Virat Kohli India vs New Zealand: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohali) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. कोहलीनं आपल्या नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार शतकानं करत श्रीलंकेला (Sri Lanka) चारी मुंड्या चीत केलं. नव्या वर्षात विराटनं श्रीलंकेविरुद्ध (INDvsSL) आतापर्यंत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आहे, ज्यात त्यानं पहिल्या सामन्यात 113 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या सामन्यात त्यानं नाबाद 166 धावांची खेळी केली.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीनं तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 283 धावा केल्या आणि तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. यासह कोहलीनं (Virat Kohali News) अनेक मोठे विक्रम मोडीत काढले, तर अनेक विक्रम आपल्या नावे केलेत. कोहलीनं घरच्या मैदानावर 21 एकदिवसीय शतकं झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 20 शतकांचा विक्रम मोडला. यासोबतच कोहलीनं एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 10 एकदिवसीय सामन्यात शतकं ठोकण्याचा मास्टर ब्लास्टरचाच विक्रमही मोडीत काढला.
सचिन-जयसूर्याच्या बरोबरीत कोहली
आता विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand National Cricket Team) तीन सामन्यांची वनडे मालिका भारतात म्हणजे, घरगुती मैदानावर खेळायची आहे. या मालिकेतही लाडक्या विराटची बॅट तळपणार असा ठाम विश्वास क्रिडाप्रेमींना आहे. जर असं खरंच झालं आणि या मालिकेतही कोहलीनं शतकी खेळी साकारली तर तो अनेक दिग्गजांचे मोठे विक्रम मोडू शकतो. आता कोहलीच्या लक्ष्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम आहे. त्यामुळे आगामी काळात खेळवल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आपला फॉर्म कायम ठेवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विराट कोहलीनं आतापर्यंत न्युझीलंडविरुद्धच्या 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतकं झळकावली आहेत. यासह, किवी संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं झळकावण्याच्या बाबतीत त्यानं सचिन आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या यांच्यासोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन आणि जयसूर्या दोघांनीही 5-5 शतकं झळकावली आहेत.
पाँटिंग-सेहवागचा विक्रम कोहलीच्या निशाण्यावर
न्यूझीलंड संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं झळकावण्याच्या बाबतीत पाँटिंग आणि सेहवाग दोघंही संयुक्तपणे अव्वल स्थानावर कायम आहेत. दोघांनी आतापर्यंत 6-6 शतकं झळकावली आहेत. अशा परिस्थितीत कोहलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन शतकं झळकावली तर पाँटिंग आणि सेहवागचा विक्रमही तो मोडीत काढून आपल्या नावे करेल.
न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं
- रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) : 51 वनडे सामन्यांमध्ये 6 शतकं
- विरेंद्र सहवाग (टीम इंडिया) : 23 वनडे सामन्यांमध्ये 6 शतकं
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) : 47 वनडे सामन्यांमध्ये 5 शतकं
- विराट कोहली (टीम इंडिया) : 26 वनडे सामन्यांमध्ये 5 शतकं
- सचिन तेंडुलकर (टीम इंडिया) : 42 वनडे सामन्यांमध्ये 5 शतकं
भारत-न्यूझीलंड पहिली वनडे बुधवारी
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये होणार आहे. तर दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Babar Azam: बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकला, अश्लिल व्हिडीओ अन् चॅट झालं व्हायरल