Rishabh Pant Health Update: अपघातानंतर क्रिकेटर ऋषभ पंत याने ट्वीट केलेय. ऋषभ पंत याने सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली. पुढील आव्हानांसाठी तयार असल्याचा विश्वास यावेळी पंतने व्यक्त केलाय. बीसीसीआय, जय शाह, सरकार, डॉक्टर्स, टीम इंडियासह सर्व चाहत्यांचे पंतने आभार मानले आहेत. त्याशिवाय पुढील आव्हानासाठी तयार असल्याचा विश्वासही पंतने व्यक्त केला आहे. दरम्यान, क्रिकेटर ऋषभ पंत याच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीत पंतवर उपचार करण्यात येत आहेत.
प्रकृतीत लक्षणीय सुधारणा -
अपघातानंतर पहिल्यांदाच क्रिकेटर ऋषभ पंत आपल्या पायावर उभा राहिला होता. पंत काही सेकंदासाठी उभा राहिला असला तरी प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येतो. पंतला पूर्ण रिकव्हर व्हायला अद्याप चार ते सहा महिने लागतील, कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती.
भारतीय विकेटकीपर ऋषभ पंत याचा 31 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. देहराडून येथे त्याच्या सुरुवातीला उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईत त्याच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातानंतर ऋषभ पंत याने पहिल्यांदाच ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. पंतने सर्वांचे आभार मानले आहेत. त्याशिवाय सर्जरी यशस्वी झाल्याचं त्यानं सांगितलं. तसेच पुढील आव्हानासाठी तयार असल्याचा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.
कधी करणार पुनरागमन?
ऋषभ पंत याने ट्वीटमध्ये बीसीसीआय सचिव जय शाह याच्याशिवाय सरकारचेही आभार मानले आहेत. कठीण काळात खूप मदत मिळाल्याचं त्यानं सांगितलं. ऋषभ पंतच्या ट्वीटनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याच्या पुनरागमानासाठी चाहते आतुरले आहेत. चाहते ऋषभ पंतच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहेत. पण 18 महिन्यापर्यंत पंत मैदानावर पुनरागमन करण्याची शक्यता नाही. आयपीएलमध्ये पंत खेळणार नसल्याचं याआधीच दिल्ली संघानं जाहीर केले आहे. ऋषभ पंत 2024 मध्येच मैदानावर दिसू शकतो. कसोटी चॅम्पियनशिप, एकदिवसीय विश्वचषक, टी20 विश्वचषकाला पंत मुकणार आहे.