Virat Kohli, T20 World Cup 2024: काही दिवसांतच आयपीएलच्या (IPL 2024) आगामी सीझनला सुरुवात होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) तयारीला सुरुवात करणार आहे. येत्या टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर असणार आहे. मात्र, टी20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या सहभागाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जूनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी20 वर्ल्डकपमधून विराटचा पत्ता कट होऊ शकतो. विराट कोहली 2022 मध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये धुरळा उडवला होता. पण यंदाचा वर्ल्डकपचं आयोजन वेस्टइंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचं म्हणणं आहे की, वेस्टइंडिजमधले स्लो पिच विराट कोहलीच्या खेळाच्या फॉर्मला साजेशी नसल्यामुळे बीसीसीआय हा मोठा निर्णय घेऊ शकते.
याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाचे चीफ सिलेक्टर्स, अजित आगरकर यांच्यावर बीसीसीआयकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोलंल जातं आहे. विराट कोहलीनं तरुणांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करावा, ही जबाबदारी आगरकरांवर सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीफ सिलेक्टर्सनी कोहलीला टी20 बाबातचा आपला दृष्टिकोन बदलायला सांगितलं होतं. त्यानंतर कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कोहली फारशी चांगली खेळी करू शकला नाही. तसेच, इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटीदरम्यान बीसीसीआयचं सचिव जय शाह कोहलीबद्दल काहीहीच बोलले नव्हते. तसेच, टीम इंडिया 2024 चा टी-20 विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल, ही घोषणा जय शाह यांनी केली होती.
दरम्यान, आता किंग कोहलीकडे टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे, आगामी आयपीएल 2024. जर किंग कोहली आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये फॉर्मात राहिला तर मात्र त्याला टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान मिळू शकतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे खेळाडू टीम इंडियाला पुढे नेण्यासाठी कोहलीपेक्षा अधिक योग्य असल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे. आता कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार की नाही, हे येता काळच सांगेल. पण, सध्या क्रीडाविश्वात मोठी खळबळ माजली आहे. अशातच, किंग कोहली वर्ल्डकप खेळू शकणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एका वर्षात 2 IPL? टी20 ऐवजी T10 फॉरमॅट; BCCI क्रिकेटप्रेमींना मोठी गूड न्यूज देण्याच्या तयारीत