Virat Kohli Instagram Followers : भारताचा माजी कप्तान विराट कोहलीला सध्या काही खास कामगिरी करता आलेली नाही. मात्र याचा परिणाम त्यांच्या फॅन फॉलोइंगवर होताना दिसत नाही. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं स्वत:च्या नावे नवा विक्रम केला आहे. भारताचा माजी कप्तान विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 20 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. विराट कोहली हा विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सध्या वाईट फॉर्ममध्ये असला तरी विराटचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत.


विराट कोहली सध्या खराब कामगिरीमुळे विश्रांती घेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील टी 20 मालिकेत विराट खेळणार नाही. क्रिकेटच्या मैदानातून सध्या विराटनं ब्रेक घेतला असला तर चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत. कोहलीने या बाबतीत नवा विक्रम करत जगभरातील क्रिकेटपटूंना मागे टाकलं आहे. विराट कोहली 20 कोटी इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.


रोनाल्डो पहिला आणि मेस्सी दुसरा खेळाडू


जगभरात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर जगभरात सर्वाधिक फॉलो केले जाणारे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 45.1 कोटी आणि मेसीचे 33.4 कोटी फॉलोअर्स आहेत.


सर्वाधिक फॉलोअर्स असलेले खेळाडू


क्रिस्टियानो रोनाल्डो : 45.1 कोटी
लिओनेल मेस्सी : 33.4 कोटी
विराट कोहली : 20 कोटी
नेमन जूनियर : 17.5 कोटी
लेब्रॉन जेम्स : 12.3 कोटी


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.