Suved Parkar in Ranji Match : सध्या सुरु असलेल्या रणजी स्पर्धेत मुंबई संघाला एक नवा स्टार खेळाडू सापडला आहे. मुंबईच्या युवा सुवेद पारकरनं (Suved Parkar) पदार्पणाच्या सामन्यातचं अप्रतिम असं द्विशतक झळकावलं आहे. यामुळे उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात (Mumbai vs Uttrakhand) देखील मुंबईने चांगली आघाडी घेतली आहे.


सध्या सामन्यात सुवेद पारकरचं पदार्पणातलं द्विशतक आणि सरफराझ खानचं (Sarfaraz Khan) शतक यांच्या जोरावर मुंबईनं उत्तराखंडविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात आपला पहिला डाव आठ बाद 647 धावांवर घोषित केला. मुंबई आणि उत्तराखंड संघांमधला हा उपांत्यपूर्व सामना बंगळुरुत सुरु आहे. या सामन्यात उत्तराखंडची दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 39 अशी बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे उत्तराखंडचा संघ तब्बव 608 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात सुवेद पारकर आणि सरफराझ खाननं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी रचून मुंबईच्या डावाला मजबुती दिली. त्यात सुवेदचा वाटा 252 धावांचा होता. त्यानं 443 चेंडूंमधली आपली द्विशतकी खेळी 21 चौकार आणि चार षटकारांनी सजवली. विशेष सांगायची बाब म्हणजे मुंबई आणि भारताला रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांच्यासारख्या गुणवान खेळाडूंची देणगी देणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यात तालमीत सुवेद पारकर घडला आहे. सुवेद पारकरला छान साथ देणाऱ्या सरफराझ खाननं 205 चेंडूंत 14 चौकार आणि चार षटकारांसह 153 धावांची खेळी उभारली.


हे देखील वाचा- 



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.