Vinod Kambli Health Update : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची तब्येत खालावल्याने त्यांना भिवंडी (Bhiwandi) येथील काल्हेर परिसरातील आकृती रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते. मागील सहा दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डम ध्ये हलवण्यात आले असून येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांना (Vinod Kambli Health Update) डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा होताच विनोद कांबळी यांनी पुष्पा 2 मधील एका गाण्यावर भन्नाट डान्स केलाय.
विनोद कांबळीचा पुष्पा 2 मधील गाण्यावर भन्नाट डान्स
तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर विनोद कांबळे यांनी थेरेपीदरम्यान पुष्पा 2 चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि “झुकेगा नहीं साला” हा प्रसिद्ध डायलॉगही ऐकवला. यावेळी त्यांनी सांगितले की डान्स हा माझ्या शरीरात आहे क्रिकेट खेळताना ही मी पाच स्टेप घेत होतो. तर लवकरच पुन्हा एकदा सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाने लवकरच सशक्त होऊन परतण्याचा विश्वास व्यक्त केला. स्वतःच्या पायावर उभे राहून दिलेला हा सकारात्मक संदेश त्यांच्या चाहत्यांसाठी आनंददायी ठरला आहे. विनोद कांबळी यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची अनोखी पद्धत आणि त्यांच्या तब्येतीतील सुधारणा चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.
शैलेश ठाकूर यांचे नाव देखील कोरणार : विनोद कांबळी
विनोद कांबळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना सांगितले की, आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले. त्यांनी शैलेश ठाकूर यांचे विशेष आभार मानले आहेत आणि त्यांच्या नावाचा टॅटूही काढणार असल्याचे जाहीर केले आहे. विनोद कांबळे यांनी पुढे सांगितले की, "जे लोक माझ्यावर अत्यंत प्रेम करतात आणि माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान ठेवतात, त्यांचं नाव मी टॅटूच्या माध्यमातून कोरत असतो." त्यांच्या हातावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे नाव, त्यांच्या पत्नीचे व मुलीचे नाव आधीच कोरले आहे. आता त्यांचं जीवन वाचवणाऱ्या शैलेश ठाकूर यांचे नाव देखील कोरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Vinod Kambli Health Update| त्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तब्येतील सुधारणा; विनोद कांबळी रडले....
इतर महत्त्वाच्या बातम्या