IND vs AUS 4th Melbourne Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका तीन सामन्यांनंतरही 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फॉर्मच्या शोधात आहे. आपला फॉर्म परत मिळवण्याच्या प्रयत्नात, रोहितने मेलबर्न कसोटीत त्याच्या फलंदाजीच्या क्रमानेही बदल केला, परंतु त्याचे नशीबच फुटकं निघाले. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात सलामीला आलेल्या रोहितला केवळ तीन धावा करता आल्या.


मेलबर्न कसोटीतही रोहित फेल


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या ॲडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीत रोहित शर्मा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल भारताकडून सलामी देत ​​होते. मात्र चौथ्या कसोटीत रोहित शर्मा यशस्वी जैस्वालसोबत सलामीला आला. पण रोहितसोबतही तीच जुनी गोष्ट पुन्हा घडली.


पॅट कमिन्सच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर रोहित शर्मा मिड-ऑनवर फिरवलेला. पण चेंडू हवेत गेला स्कॉट बोलंडने रोहितचा सोपा झेल घेतला. मेलबर्न कसोटीत सलामीला आलेल्या रोहित शर्माने केवळ 5 चेंडू खेळले आणि 3 धावा करून तो बाद झाला.






ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितला 10 धावांचा टप्पाही आला नाही ओलांडता


ॲडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीनंतर रोहित शर्माने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावापर्यंत 4 डाव खेळले आहेत. या चार डावांत त्याने केवळ 22 धावा केल्या आहेत. ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात 3 धावा केल्यानंतर आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्यानंतर तो बाद झाला. ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात 10 धावा करून तो बाद झाला. आता तो मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 3 धावा करून बाद झाला आहे.


रोहितच्या 14 कसोटी डावांमध्ये धावा


भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी : 6, 5
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी : 23, 8
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी : 2, 52
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी : 0, 8
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी कसोटी : 18, 11
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी : 3, 6
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी : 10
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी : 3


हे ही वाचा -


Mohammed Siraj : 'DSP सिराजचा हा शेवटचा सामना...?', खराब गोलंदाजीवर चाहते संतापले, मेलबर्न कसोटी विकेटलेस