WTC Final 2023 : पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलध्ये बॉल टेम्परिंग झाल्याचा आरोप केलाय. बासित याने ऑस्ट्रेलियाच्या संघावर गंभीर आरोप केले आहेत. बासित यांच्या मते, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना ऑस्ट्रेलियाने हेराफेरी करुन बाद केलेय. बासित यांनी यूट्युब व्हिडीओवर ऑस्ट्रेलियाच्या संघावर गंभीर आरोप केले आहेत. बासित अली यांनी पाकिस्तानसाठी 19 कसोटी आणि 50 एकदिवसीय सामने खेळले आहेत.  


कुठे झाली टेम्परिंग ?
बासित म्हणाला की, भारतीय संघाच्या 16 ते 18 षटकात चॅम्परिंग झाल्यासा सर्वात मोठा पुरावा आहे.  18 व्या षटकात पंच  रिचर्ड कॅटलबोरो यांच्या सूचनेनंतर चेंडू बदलण्यात आला. तोपर्यंत चेंडू खराब झाला होता.  16, 17 आणि 18 वे षटक पाहिल्यास टेम्परिंग दिसून येईल. विराट कोहली बाद झाला त्या चेंडूची चमक पाहा...  बासित म्हणाले की,  मैदानावर काय चालले, याबाबत कोणत्याही फलंदाजाला संशय आला नाही. चेंडू सोडल्यानंतर ब्लोड होणं, हे सर्वोत्तम उदाहरण आहे. 


पंच-समालोचकावर साधला निशाणा - 


बासित म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या प्लॅनला कुणीही पाहू शकले नाही, हे पाहून आश्चर्य वाटले. समालोचक आणि पंचांनाही ही बाब दिसली नाही.  तिसरे पंच असो अथवा मैदानावर असणारे भारतीय फलंदाजांनाही समजले नाही. कुणीच ऑस्ट्रेलियाची टॅक्टिक्स पकडली नाही. 






पुजाराला चिडून बाद केले - 
बासित म्हणाले की, जडेजा चेंडू ऑनसाईडला फटकावणार होता... पण चेंडू पॉइंटकडे गेला. पंचांना काहीच दिसले नाही का..?  पुजाराच्या विकेटबाबातही बासितने संशय व्यक्त केला. कॅमरुन ग्रीनने पुजाराला टाकलेल्या चेंडूची चमक पुजाराच्या बाजूने होती...चेंडू आत आला अन् तो क्लिन बोल्ड झाला... टेम्परिंग केल्याशिवाय चेंडू आत येऊच शकत नाही. ऑस्ट्रेलियाने टेम्परिंग केलेय. बीसीसीआयला ही बाब समजली नाही का ? ड्युक बॉल 40 षटकांपर्यंत रिवर्स स्विंग होत नाही, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आधीच कसा रिव्हर्स स्विंग केला..? 


लाबुशेनचा व्हिडीओ व्हायरल? 
बासित यांच्या आरोपानंतर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याचा बॉल घासतानाचा व्हिडीओ व्हायरल जालाय. खरबडीत असणाऱ्या क्रॅप ब्रँडने बॉल घासताना लाबुशेन दिसत आहे. ट्विटीवर व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याशिवाय क्रॅप ब्रँडने चेंडू घासण्याची परवानगी आहे का ? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


पाहा व्हिडीओ