U19 Asia Cup 2024 IND vs UAE : आयपीएलमधील सर्वात युवा कोट्याधीश वैभव सूर्यवंशीनं अंडर 19 आशिया कप स्पर्धेत दमदार फलंदाजी केली आहे. वैभव सूर्यवंशी  आणि सलामीवीर आयुष म्हात्रे यांच्या जोडीनं दमदार फलंदाजी करत भारताला 10 विकेटनं विजय मिळवून दिला. भारताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत यूएईला 137 धावांवर बाद केलं. यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या आक्रमक फलंदाजीमुळं भारतानं दणदणीत विजय मिळवला.  


वैभव सूर्यवंशीनं अंडर 19 आशिया कप स्पर्धेत दमदार फलंदाजी केली. त्यानं नाबाद 76 धावा केल्या. वैभवनं 46 बॉल खेळले. यामध्ये त्यानं 6 षटकार आणि 3 चौकार मारले. वैभवला या खेळीत त्याचा साथीदार सलामीवीर आयुष म्हात्रे याची साथ मिळाली. आयुष म्हात्रे यानं 67 धावांची खेळी केली. त्यानं एक विकेट देखील घेतली होती. त्यामुळं त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.  


वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी यूएईच्या गोलंदाजांची धुलाई केल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. आयुष म्हात्रेनं 51 बॉलमध्ये 67 धावा केल्या. या खेळीत त्यानं 4 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय त्यानं एक विकेट देखील घेतली. 


भारताचा 16.1 ओव्हरमध्ये विजय


भारताच्या गोलंदाजांनी यूएईच्या संघाला 44 ओव्हरमध्ये 137 धावांवर बाद केलं. युधाजित गुहा यानं 3, चेतन शर्मा यानं 2, हार्दिक राज यानं2 कार्तिकेय केपी आणि आयुष म्हात्रे यानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. यानंतर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.  


भारतानं हा सामना 16.1 ओव्हरमध्ये जिंकला. यूएईच्या एकाही गोलंदाजाला आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीला बाद करता आलं नाही. भारतानं यापूर्वीच्या मॅचमध्ये जपानला देखील पराभूत केलं होतं.  


आयपीएलमधील युवा करोडपती 


वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये चर्चेत आला. राजस्थान रॉयल्सनं त्याला 1.10 कोटी देऊन खरेदी केलं. बेस प्राईस पेक्षा अधिक रक्कम त्याला मिळाली. वैभव सूर्यवंशीला आपल्या संघात घ्यावं यासाठी इतर संघांमध्ये चढाओढ लागली होती. वैभव सूर्यवंशीचं वय केवळ 13 वर्ष इतकं असून तो बिहारचा आहे.






इतर बातम्या :