न्यूयॉर्क : अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. यातील पहिली मॅच मंगळवारी झाली. या मॅचमध्ये अमेरिकेनं बांगलादेशला दणका दिला. अमेरिकेनं बांगलादेशला पाच विकेटनं पराभूत करत खळबळ उडवून दिली. अमेरिकेला विजय मिळवून देणाऱ्या हरमीत सिंगचा जन्म मुंबईत झाला आहे.


    
टी-20 क्रिकेटमधील 19 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेनं नवव्या क्रमांकावर असलेल्या बागंलादेशला पराभूत केलं. टेक्सासमध्ये झालेल्या मॅचमध्ये अमेरिकेनं बांगलादेशला पाच विकेटनं पराभूत केलं. बांगलादेशवर विजय मिळवत अमेरिकेनं 1-0 अशी आघाडी घेतली. अमेरिकेनं टी-20 क्रिकेटमधील दुसरा विजय मिळवला. पहिला विजय 2021 मध्ये आयरलँडवर विजय मिळवला होता. 


भारताकडून अंडर-19 मध्ये खेळलेल्या आणि सध्या अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीत सिंगनं सलग तीन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.हरमीत सिंगनं 13 बॉलध्ये 33 धावा केल्या. हरमीत सिंगनं कोरी अँडरसन सोबत 4.4 ओव्हरमध्ये 62 धावांची भागिदारी केली. कोरी अँडरसननं नाबाद 34 धावा केल्या. 


  
बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 153 धावा केल्या. अमेरिकेनं 4 विकेटवर 68 धावा अशी बांगलादेशची अवस्था केली होती. यानंतर लिट्टन दास आणि नजमूल हुसैन शांटो आणि इतर खेळाडूंनी संघाला 153 धावांपर्यंत पोहोचवलं. तोव्हिद एच.नं 58 धावा केल्या.  


 अमेरिकेकडून हरमीत सिंग आणि कोसी अँडरसन या दोघांनी दमदार फलंदाजी करत बांगलादेशला पराभूत केलं. अमेरिकेला विजयासाठी 20 बॉलमध्ये 50 धावा हव्या होत्या. हरमीत सिंगनं मुस्तफिजूरला दोन षटकार मारत बांगलादेशवर दबाव वाढवला. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये हरमीत सिंगनं आणखी एक षटकार शोरिफूलला मारला



कोसी अँडरसन यानं देखील जोरदार फलंदाजी केली. अखेरच्या ओव्हरमध्ये अमेरिकेला 15 धावांची गरज होती. कोसी अँडरसननं पहिल्या दोन बॉलवर षटकार मारले. यानंतर तिसऱ्या बॉलवर फोर मारत अँडरसननं अमेरिकेला विजय मिळवून दिला.  


बांगलादेश पलटवार करणार?


अमेरिकेनं पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला असला तरी बांगलादेशकडे पलटवार करण्याची संधी आहे राहिलेल्या दोन मॅचमध्ये बागंलादेश पलटवार करु शकतं. अमेरिका टी-20 वर्ल्डकपमध्ये अ गटात आहे. अमेरिका आणि  भारत यांच्यात 12 जूनला मॅच होणार आहे.  यंदा टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडून करण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये काही सामने होणार आहेत. 


संबंधित बातम्या : 


IPL 2024 RR vs RCB Eliminator: आज राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटरचा रंगणार सामना


IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; सुनील गावसकर यांची भविष्यवाणी, संघाचं नाव सांगितलं!