Todd Murphy : पदार्पणाच्या सामन्यातच टॉड मर्फीची कमाल, पहिल्या डावात 5 बळी घेत खास पंगतीत मिळवलं स्थान
IND vs AUS : भारताविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीने पहिल्या डावात 5 भारतीय फलंदाजांना तंबूत धाडलं. पदार्पणाच्या कसोटीत पाच विकेट घेणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर ठरला आहे.
IND vs AUS, 1st Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (Border Gavaskar trophy) मालिका सध्या सुरु आहे. नागपूर येथे सलामीचा कसोटी सामना सुरु असून भारत सध्या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारत 144 धावांच्या आघाडीवर असला तर ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने मात्र सर्वांनाच आपल्या कमाल कामगिरीने चकीत करुन सोडलं आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा ऑफ-स्पिनर गोलंदाज टॉड मर्फीने (Todd Murphy) आपला सलामीचा सामना खेळत दमदार पदार्पण केलं. भारताविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात या ऑस्ट्रेलियन युवा खेळाडूने पहिल्या डावात 5 विकेट्स घेत नवा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा ऑफस्पिनर ठरला आहे. अशी कमाल कामगिरी करणाऱ्या इतर खेळाडूंबद्दल जाणून घेऊ...
पीटर टेलर
या यादीत पहिलं नाव आहे पीटर टेलरचं. त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 1986/87 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणात 78 धावांत 6 बळी घेतले.
जेसन क्रेझा
या यादीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा ऑफस्पिनर जेसन क्रेझा आहे. या खेळाडूने 2008/09 दरम्यान नागपुरात भारताविरुद्ध पदार्पण केलं.आपल्या पहिल्याच सामन्यात क्रेझाने 215 धावांत 8 बळी घेतले होते.
नॅथन लियॉन
या यादीत तिसऱ्या ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनरचे नाव नॅथन लियॉन आहे. नॅथनने 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने अवघ्या 34 धावा करून 5 श्रीलंकेच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
टॉड मर्फी
नॅथननंतर, असा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियाचा पुढचा ऑफस्पिनर टॉड मर्फी आहे, जो सध्या नागपूर कसोटीत नॅथनसोबत खेळत आहे. मर्फीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या नागपूर कसोटीत भारताविरुद्ध पदार्पण केले आहे. पहिल्याच सामन्यात त्याने 5 विकेट्स घेत आपलं नाव या यादीत समाविष्ट केले.
कसोटीत आतापर्यंत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) पहिला कसोटी सामना (India vs Australia 1st Test) सुरु असून दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला आहे. दिवसअखेर भारताने 7 गडी गमावत 321 धावा ठोकल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी अवस्था असताना दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहितच्या शतकानंतर अक्षर आणि जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा विचार करता त्यांचा संपूर्ण संघ 177 धावांवर सर्वबाद झाला होता. यावेळी जाडेजाने 5 तर अश्विननं 3 विकेट्स घेतल्या होत्या.
हे देखील वाचा-