PM Modi & Rahul Dravid On Los Angeles Olympics 2028: टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2024) जिंकून भारतीय खेळाडू मायदेशी परतले. यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या खेळाडूंव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यावेळी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या यशासोबतच नरेंद्र मोदींनी इतर खेळांच्या सुधारणेवरही चर्चा केली. याशिवाय नरेंद्र मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 वरही भाष्य केलं. 2028 मध्ये ऑलिम्पिक लॉस एंजेलिस येथे आयोजित केले जाणार आहे.


ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाकडून अपेक्षा-


नरेंद्र मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि क्रिकेटमधील टीम इंडियाबद्दल विचारले असता, राहुल द्रविड म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये खेळणे ही क्रिकेटपटूंसाठी मोठी गोष्ट असेल, तसेच देश आणि बोर्डासाठी एक उपलब्धी असेल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही अभिमानाची बाब असेल. मला आशा आहे की या संघातील अनेक खेळाडू ऑलिम्पिक 2028 चा भाग असतील, अनेक युवा खेळाडू असतील, परंतु आमची नजर सुवर्ण जिंकण्यावर असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसह क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. गेल्या 100 वर्षांपासून क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग नाही.






बार्बाडोस ते दिल्ली आणि मुंबई...


तत्पूर्वी गुरुवारी सकाळी 6 वाजता भारतीय खेळाडू बार्बाडोसहून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचवेळी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईत भारतीय खेळाडूंची विजयी यात्रा सुरू झाली. या परेडमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टू-20 विश्वचषक विजेता ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.






संबंधित बातम्या:


125 Crore Prize Money Distribution: भारतीय संघामध्ये 125 कोटी रुपयांचे वाटप कसे होणार?; टॅक्स किती कापणार?, जाणून घ्या!


गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video


हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?