ENG vs IND: बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या महत्वाच्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्याची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. येत्या 7 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना साउथहॅम्प्टनच्या द रोज बाउल येथे रात्री 10.30 वाजता सुरू होईल. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेच्या तिकीट विक्रीला सुरुवात झालीय. या सामन्यांसाठी कुठे आणि कसं तिकीट बुकींग करायचं? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी तिकीट विक्री सुरू झालीय. पहिल्या टी-20 सामन्यासाठी तिकीट खरेदी करण्यात चाहत्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी तिकीट कसं बूक करायचं? हे जाणून घेऊयात.
तिकीट बूक करण्याची प्रक्रिया-
- तिकिटे बुक करण्यासाठी अधिकृत तिकीट वेबसाइटवर लॉग इन करा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या सामन्यासाठी तिकीट बुक करायचं आहे, त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला सर्व तिकिटांच्या किमतींची यादी दिसेल.
- आता तुमच्या बजेटनुसार सीटची निवड करा.
- सीट निवडल्यानंतर सर्व तपशील पुन्हा तपासा आणि पेमेंट करा.
- तिकीट बूक झाल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमचा इमेल चेक करू शकतात.
भारतीय टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
हे देखील वाचा-