ENG vs Ind 5th Test: बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघानं भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 5 विकेट्स गमावून 85 केल्या. या सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Jony Bairstow) यांच्यात सामन्यादरम्यान बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.


नेमकं काय घडलं?
बर्मिंगहॅम कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच विराट कोहली जॉनी बेअरस्टोशी भिडल्याचं पाहायला मिळालं. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 32 व्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गोलंदाजी आला. या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाली. या दरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि नंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर पंचानी मध्यस्ती करत विराट कोहली आणि इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांशी संवाद साधला.


व्हिडिओ-






 


भारताच्या पहिल्या डावात विराट स्वस्तात माघारी परतला
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीची बॅट शांत दिसली. या सामन्यात त्यानं 19 चेंडूत 11 धावा करत स्वस्तात माघारी परतला. ज्यात फक्त दोन चौकारांचा समावेश आहे. भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 


हे देखील वाचा-