अमृतसर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे दोन वरिष्ठ पदाधिकारी (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla ) यांवी पाकिस्तानला भेट दिली आहे. 17 वर्षांनंतर पहिल्यांदाज बीसीसीआयचे पदाधिकारी पाकिस्तानमध्ये पोहचले आहेत. आशिया कप पाहण्यासाठी रॉजर बिन्नी आणि राजीव शुल्का पाकिस्तानमध्ये पोहचले आहेत. आशिया चषकाचा सामना पाहण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या निमंत्रणाचा सन्मान करत बीसीसीआयचे पदाधिकारी पाकिस्तानमध्ये गेले आहेत. रॉजर बिन्नी आणि राजीव शुल्का यांनी सोमवारी अटारी-वाघा बॉर्डर पार करत लौहेरमध्ये पोहचले आहेत. 


भारतीय संघाने 2008 मध्ये आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेलाच नाही. द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ 2006 मध्ये पाकिस्तानमध्ये पोहचला होता. पण राजकीय कलहामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले. त्यामुळे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा वगळता आमनेसामने येत नाहीत. आता आशिया चषकासाठी दोन्ही संघ लढत आहेत. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला, त्यामुळे यंदाचा आशिया चषख हायब्रिड मॉडेलनुसार घेण्याचा निर्णय घेतला. चार सामने पाकिस्तानमध्ये तर 9 सामने श्रीलंकामध्ये होत आहेत. फायनलचा थरार श्रीलंकामध्ये होणार आहे. पाकिस्तानमधील अखेरचा सामना 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंका आणि आफगाणिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पोहचले आहेत. 
 
पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या राज्यपालांनी आयोजित केलेल्या डिनरसाठी रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांच्या सहभागाला बीसीसीआयने मान्यता दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, पाकिस्तान आशिया चषकाचा यजमान आहे. आमचा दौरा हा राजकीय नाही, आम्ही फक्त क्रिकेटच्या कारणामुळे पाकिस्तान दौऱ्यावर आलो आहे. हा दोन दिवसांचा दौरा आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगाणिस्तानचा संघही असेल. क्रिकेटला राजकारणाशी जोडायला नको.
 





गेल्या दोन दशकांपासून बीसीसीआयशी संबंधित असलेले उपाध्यक्ष राजीव शुक्ला 2004 मध्ये झालेल्या ऐतिहासिक 'फ्रेंडशिप सीरिज'साठी बीसीसीआयच्या शिष्टमंडळाचा भाग होते. ते पाकिस्तानमध्ये गेले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरु होण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता राजीव शुक्ला म्हणाले की, द्विपक्षीय मालिकेबाबतचा निर्णय भारत सरकार घेतो. केंद्र सरकार जी काही सूचना देईल ती आम्हाला मान्य असेल. 


बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी यावेळी आपल्या पाकिस्तान दौऱ्याच्या आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले. रॉजर बिन्नी 16 वर्षांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य म्हणून पाकिस्तानमध्ये गेले होते.  बिन्नी म्हणाले की, “माझा शेवटचा पाकिस्तान दौरा 2006 मध्ये झाला होता. तेव्हा मी आशियाई क्रिकेट परिषदेचा भाग होतो. पाकिस्तानचा पाहुणचार खूप चांगला आहे. आम्हाला खूप चांगली वागणूक मिळाली.”