Asia Cup 2023, IND Vs NEP Live Updates : नेपाळ आणि भारत यांच्यातील अखेरचा साखळी सामना सुरु झाला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नेपाळच्या फंलदाजांनी रोहित शर्माचा हा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. नेपाळच्या फलंदाजांनी सावध खेळी करत धावसंख्या वाढवली. नेपाळने पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागिदारी केली. नेपाळच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांची गोलंदाजी फोडून काढली. पण याला भारतीय फिल्डर्स जबाबदार असल्याचे दिसतेय. पहिल्या पाच षटकात भारतीय फिल्डर्सनी तीन झेल सोडले. याचाच फायदा नेपाळच्या फलंदाजांनी घेतला. 


पहिल्याच षटकात नेपाळच्या कुशल भुर्टेल याला जीवनदान मिळाले. मोहम्मद शामीच्या अखेरच्या चेंडूवर कुशल भुर्टेल (Kushal Bhurtel) स्ट्राईकवर होता. या चेंडू कुशलच्या बॅटला लागून स्लिप्समध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे गेला. पण अय्यरला झेल घेताल आले नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा स्लिप्समध्ये फलंदाजाल जीनवदान मिळाले. मात्र, यावेळी झेल विराट कोहली (Virat Kohli) याच्या हातून सुटला होता. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जीवनदान मिळेल होते.  


नेपाळच्या डावातील पाचव्या षटकात देखील भारतीय संघानी खराब फिल्डिंग केले.  यष्टीरक्षक ईशान किशन (Ishan Kishan) याच्याकडून कुशल  याला पुन्हा एक संधी दिली. यावेळीही गोलंदाज मोहम्मद शामी होता. भारताच्या खराब फिल्डिंगचा फायदा घेत नेपाळने मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केली आहे. बातमी लिहिण्यापर्यंत नेपाळने दोन विकेटच्या मोबदल्यात 88 धावा केल्या होत्या. 


भारताच्या खराब फिल्डिंगचे नेटकऱ्यांनी चांगलेच झोडपले. सोशल मीडियावर चाहत्यांनी भारतीय संघावर टीकास्त्र सोडलेय. विराट, अय्यर आणि इशान यांच्याकडून अशी आपेक्षा नव्हती... यासारख्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. 


 














भारताची प्रथम गोलंदाजी -


Asia Cup 2023, IND Vs NEP Live Score : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे राहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे. 


पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला.त्यामुळे भारताला एका गुणांवर समाधान मानावे लागले. आता आशिया चषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय गरजेचा आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ दोन गुणांसह सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.