Pakistan Cricketer Mohammad Irfan Announces Retirement : पाकिस्तान क्रिकेटमधील निवृत्तीचा ट्रेंड थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. 36 तासांत तीन खेळाडूंनी क्रिकेला रामराम ठोकला आहे. अष्टपैलू इमाद वसीम आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनंतर आता सात फूट एक इंच उंचीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. त्याने 2019 मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
इरफानच्या निवृत्तीमुळे पाकिस्तानला असा काही मोठा धक्का बसणार नाही. कारण तो बराच दिवासांपासून संघातून बाहेर आहे. अलीकडेच त्याने प्रेसिडेंट चषकात खान संशोधन प्रयोगशाळांचे प्रतिनिधित्व केले होते. ही पाकिस्तानी लिस्ट ए स्पर्धा आहे. हा उंच डावखुरा गोलंदाज आजपर्यंतचा सर्वात उंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मानला जातो. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये 86 वेळा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले.
निवृत्ती घेताना काय म्हणाला इरफान?
इरफान म्हणाला, "मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या संघसहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहेत. प्रेम, उत्साह आणि अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद.
इरफानने विराट कोहलीची घेतली होती विकेट
इरफानने पाकिस्तानकडून सर्व फॉरमॅटमध्ये 109 विकेट घेतल्या. 2013 मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यासामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. इरफानने ग्रॅम स्मिथ, कॉलिन इंग्राम, एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डू प्लेसिस यांना नव्या चेंडूने आऊट केले होते. इरफानचे T20I पदार्पणही संस्मरणीय ठरले. भारत दौऱ्यात त्याने विराट कोहलीची विकेट घेतली होती. 2012 मध्ये बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात इरफानने 4 षटकात 25 धावा दिल्या होत्या.
मोहम्मद इरफानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मोहम्मद इरफानच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात 2012 मध्ये भारत दौऱ्यावरून झाली. त्याने आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानसाठी एकूण 4 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले. या कसोटीत त्याने 10 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात 83 विकेट घेतल्या आहेत, याशिवाय टी-20मध्ये त्याच्या नावावर 16 विकेट आहेत. मोहम्मद इरफानही त्याच्या कारकिर्दीत दुखापतींनी त्रस्त होता, त्यामुळे तो सतत पाकिस्तान संघातून बाहेर जात होता. मात्र, तो काही काळापासून जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे आणि त्यात तो खेळत राहणार आहे.
हे ही वाचा -