Mohammed Siraj Flips The Bails : ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दिवशी पाऊस खलनायक ठरला, आणि केवळ 13.2 षटकांचा सामना झाला. 


दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव आणला. बुमराहने लवकरच दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मोहम्मद सिराजने विकेट मिळविण्यासाठी बेल बदलण्याची ट्रिक वापरली.




DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला....


ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाच्या 33व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवर तो थेट स्ट्राईक एंडच्या दिशेने गेला आणि त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या लॅबुशेनने त्याला असे करताना पाहिले, तोही सिराजला काहीतरी म्हणाला. यानंतर, सिराज त्याच्या रनअपसाठी माघारी जायला लागताच लॅबुशेनने पुन्हा दोन्ही जामीनांची स्थिती बदलली.




खरंतर, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 33 वे षटक सुरू होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने मार्नस लॅबुशेनविरुद्ध जोरदार अपील केले, परंतु पंचांनी आऊट दिला नाही. त्यानंतर सिराजने बॅटिंग एंडला जाऊन बेल्सची अदलाबदल केली. मात्र, सिराज बॉलिंग करण्यासाठी जात असताना, लॅबुशेनने पुन्हा बेल्स बदलले. हे दृश्य पाहून मैदानावरील पंच आणि मैदानावर उपस्थित टीम इंडियाचे खेळाडूही हसू लागले. आता या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला एक प्रकारची युक्ती म्हणतात, कारण जेव्हा विकेट पडत नाहीत तेव्हा गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा गोष्टी करतात. आणि यामध्येच लॅबुशेन फसला. 


पुढच्याच षटकात लॅबुशेन परतला पॅव्हेलियनमध्ये 


बेल बदलण्याच्या घटनेनंतर पुढच्याच षटकात नितीश रेड्डीच्या चेंडूवर मार्नस लॅबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला. ज्यामध्ये त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटचा कट घेऊन थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. 55 चेंडूंचा 12 धावांची खेळी खेळल्यानंतर मार्नस लॅबुशेन आऊट झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 75 धावांवर तिसरी विकेट गमावली.


हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : बूम-बूम बुमराहची जादू! 2 ओव्हरमध्ये केली ऑस्ट्रेलियाच्या दोन तगड्या खेळाडूंची शिकार, VIDEO