Jasprit Bumrah Ind vs Aus 3rd Test Day-2 : ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना खेळला जात आहे. पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ खराब झाला, आणि केवळ 13.2 षटकांचा सामना होऊ शकला. मात्र दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली. जसप्रीत बुमराहने 16व्या षटकात उस्मान ख्वाजाची विकेट घेत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर त्याने पुढील षटकात नॅथन मॅकस्वीनीलाही आपला शिकार बनवले. म्हणजे बुमराहने 2 षटकात 2 सलामीवीरांची शिकार केली.
बुमराहने सापळा रचला अन् केली उस्मान ख्वाजाची विकेट शिकार
उस्मान ख्वाजाची विकेट घेण्यासाठी बुमराहने आधी सापळा रचला होता. खरंतर, 14 वे षटक बुमराहने टाकले होते आणि यादरम्यान त्याने सर्व चेंडू ख्वाजाला खेळण्यात भाग पाडले. बुमराहने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने त्याच्यावर दडपण आणले आणि मग तो 16 वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ख्वाजाला ऋषभ पंतकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहची रणनीती पाहून समालोचकही त्याचे कौतुक करताना दिसले.
बुमराह इथेच थांबला नाही, त्यानंतर 19व्या षटकात दुसरा सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला बाद करून त्याने आपली दुसरी विकेट मिळवली. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. 9 धावा करून तो आऊट झाला.
पहिल्या दिवसाच्या 13 षटकांच्या खेळात टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. बुमराह आणि आकाश दीप आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणत होते, मात्र त्यांना विकेट मिळाली नाही. बुमराहने दुसऱ्या दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे, ते पाहता कांगारूंना त्याच्यापासून सावध रहावे लागेल.
दोन्ही संघांसाठी गाबा कसोटी अत्यंत महत्त्वाची
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेचा पहिला सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अप्रतिम पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांचा 10 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघ गाबा कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलिया आणि भारत अजूनही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत.
हे ही वाचा -