(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मिथला कसे बाद करायचे? इंग्लंडच्या ब्रॉड-अँडरसन जोडीने घेतली AI Bot ची मदत
England vs Australia Ashes 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरु होणार आहे.
England vs Australia Ashes 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरु होणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिय एकमेंकासमोर उभे ठाकतील. १६ जून एजबेस्टनपासून अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. क्रिकेट विश्वातील आघाडीचे दोन संघ एकमेंकाविरोधात लढतील. पाच सामन्याच्या अॅशेस कसोटी मालिकेत कोण बाजी मारणार याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेय. अॅशेस मालिकेची तयारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सुरु केली आहे.
जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही जोडगोळी इंग्लंडचा वेगवान मारा करेल. या दोन दिग्गज गोलंदाजांनी आतापर्यंत सर्वांनाच प्रभावित केलेय. पण अॅशेसमधील स्मिथ याचा फॉर्म पाहाता इंग्लंडच्या गोलंदाजांना धडकी भरली असेल. स्टिव्ह स्मित याला कसोटीत कसे बाद करायचे... याबाबात अँडरसन आणि ब्रॉड यांनी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी या दोघांनी AI Bot ची मदत घेतली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोशल मीडियावर याचीच चर्चा दिसून येत आहे.
अॅशेस कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांन तयारी सुरु केली आहे. या मालिकेपूर्वी स्काय स्पोर्ट्सने एक प्रमो रिलिज केलाय. यामध्ये जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड दिसत आहे. इंग्लंडची ही जोडगोळी ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला कसे बाद करायचे याबाबत AI Bot ला विचारत असल्याचे दिसतेय. त्यावर AI Bot कडून स्मिथला बाद करणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले. पण इंग्लंडच्या गोलंदाजांना AI Bot ने महत्वाचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला बाद करण्यासाठी शॉर्ट पिच चेंडूचा वापर करा.. तसेच आक्रमक फिल्डिंग लावा.. असा सल्ला AI Bot ने अँडरसन आणि ब्रॉड यांना दिलाय.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ -
"It's like reading off @nassercricket's clipboard this" 🤣📋@jimmy9 and @StuartBroad8 ask The Sky Sports Ashes AI Bot how to get Steve Smith out 🤖 pic.twitter.com/XEiuqwjVuq
— Sky Sports Cricket (@SkyCricket) April 28, 2023
स्काय स्पोर्ट्सकडून ट्विटरवर हा प्रमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये AI Bot म्हणते की, स्टिव्ह स्मित एक असाधारण फलंदाज आहे, त्याला कोणत्याही प्लॅनिंगने बाद करण्याची गॅरेंटी नाहीय.. AI Bot चे हे मत एकून ब्रॉडला हसू येते.
अशेसमध्ये स्मिथची कामिरी कशी राहिली आहे -
अॅशेस मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात स्मिथ पाचव्या क्रमांकावर आहे. स्मिथने ३२ डावात ६० च्या सरासरीने तीन हजार धावा काढल्या आहेत. यामध्ये ११ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. स्मिथ याने २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. स्मिथ याने सात डावात ११० च्या सरासरीने ७७४ धावा काढल्या होत्या.