IND vs PAK, T20 WC 2021 : विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव करत पाकिस्तान संघानं इतिहास रचला. भारतीय संघाच्या विश्वचषकाची सुरुवात पराभवामुळे झाली. भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं ती म्हणजे, फलंदाजी. दिग्गज फलंदाजांना भरणा असताना विराट-पंत वगळता एकाही फलंदाजा लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. युवा शाहीन आफ्रिदीच्या माऱ्यापुढे आधी रोहित शर्मा अन् नंतर के. एल राहुल बाद झाले. शाहीनने भारताच्या सलामीवीरांना बाद करत भारताचे कंबरडे मोडलं. पण, के. राहुल पंचाच्या चुकीमुळे बाद झाल्याचं समोर आलं आहे. राहुल नो-बॉलवर बाद झाल्याचं फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. अंपायर झोपला होता का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय. 


शाहीन आफ्रिदीच्या अप्रितम चेंडूवर राहुल त्रिफाळाचीत बाद झाला. मात्र, टिव्ही रिप्लायमध्ये शाहीनचा हा चेंडू नो-बॉल असल्याचं स्पष्ट दिसत होतं. एरव्ही सजग असणारे पंच या सामन्यात झोपले होते का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शाहीनचे गोलंदाजी करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्रिफाळाचीत बाद झाल्यानंतर राहुल मैदानाबाहेर गेला खरा.. पण त्यावेळापर्यंत पंच काय करत होते? असाही प्रश्न उपस्थित राहतो. महत्वाच्या सामन्यात केलेल्या चुकीमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सुर्यकुमार यादवलाही खराब पंचगिरीचा फटका बसला. हसन अलीने सहाव्या षटकातला तिसरा चेंडू नो बॉल टाकला होता. मात्र पंचांनी तो चेंडू नो बॉल दिला नाही. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरच सुर्यकुमार यादव बाद झाला. भारताचे तीन गडी झटपट बाद झाल्याने धावगतीवर परिणाम झाला.


पाहा नेटकरी काय म्हणाले?































शाहीन आफ्रिदीच्या वेगवान आणि अचूक टप्प्यावरील गोलंदाजीपुढे भारतीय संघातील अव्वल फलंदाजांनी नांग्या टाकल्या. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. राहुललाही फार काळ मैदानावर तग धरता आला नाही. विराट कोहलीने आपलं काम चोख बजावलं. मात्र, मोक्याच्या क्षणी आपली विकेट फेकली. भारताच्या आघाडीच्या तिन्ही फलंदजांना शाहीन आफ्रिदीनं बाद केलं. पहिल्या सहा षटकात तीन गडी गमावले असताना भारतीय संघानं 20 षटकात 151 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्त्युत्तर पाकिस्तान संघाच्या सलामीवीरांनी एकहाती सामना जिंकून दिला.