ICC Womens T20I Cricketer of the Year 2022 nominees : पुरुषांसह महिला क्रिकेटचे सामनेही अलीकडे तितकेट रंगतदार होताना दिसत आहेत. महिला क्रिकेटर्सना पुरुषांईतके वेतन देण्याचा निर्णयही नुकताच बीसीसीआयनं जाहीर केला. आगामी वर्षात महिला आयपीएलही होणार आहे. या सर्वांमध्ये आयसीसीने 2022 वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 4 महिला खेळाडूंना 'आयसीसी महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' पुरस्कारासाठी नामांकित देखील केलं आहे. यामध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हीचं नाव असून सोबतच पाकिस्तानची निदा दार (Nida Dar), न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन (Sophie Devine) आणि ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) या खेळाडूंनाही नामांकन मिळालं आहे.
नामांकन मिळालेल्या चारही महिला खेळाडूंनी वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. यामध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृतीचा विचार करता तिने एकूण 23 टी20 सामन्यांमध्ये तिने 5 अर्धशतकांच्या मदतीनं 594 रन केले आहेत. याशिवाय अष्टपैलू निदा दार या पाकिस्तानच्या महिला खेळाडूलाही नामांकन मिळालं आहे. तिने यंदा 16 सामने खेळत 396 रन ठोकले. तर सोबतच तब्बल 15 विकेट्सही खिशात घातल्या. याशिवाय न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईन हिने देखील 14 टी20 सामने खेळले. यामध्ये तिने 389 रन करत 13 विकेट्सही खिशात घातले. तर ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) ने 16 सामन्यात 13 विकेट्स घेत 435 धावा देखील ठोकल्या आहेत.
पुरुषांमध्ये कुणालं मिळालं नामांकन?
2022 वर्षभरात बऱ्याच टी20 स्पर्धा झाल्या, ज्यात अनेक खेळाडूंनी दमदार असा खेळ दाखवला, पण या सर्वांमधील 4 क्रिकेटर्सना 'आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' (ICC Mens T20I Cricketer of the Year) च्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. या चौघांमध्ये एका भारतीय खेळाडूचं नाव असून हा खेळाडू म्हणजे सध्या टी20 फलंदाजांच्या यादीत अव्वल असणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्यासह पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (mohammad rizwan), इंग्लंडचा सॅम करन (sam curran) आणि झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (sikandar raza) या खेळाडूंनाही नामांकन मिळालं आहे.
हे देखील वाचा-