ICC Mens T20I Cricketer of the Year 2022 nominees : 2022 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी फार खास होतं. खासकरुन टी20 क्रिकेट तर वर्षभरात खूप खेळवण्यात आले. कारण टी20 चा विश्वचषक (T20 World Cup 2022) झालाच शिवाय आशिया कपही (Asia cup) यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच क्रिकेटर्सनी कमाल कामगिरी केली. पण या सर्वांमधील 4 क्रिकेटर्सना 'आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' (ICC Mens T20I Cricketer of the Year) च्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. या चौघांमध्ये एका भारतीय खेळाडूचं नाव असून हा खेळाडू म्हणजे सध्या टी20 फलंदाजांच्या यादीत अव्वल असणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्यासह पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (mohammad rizwan), इंग्लंडचा सॅम करन (sam curran) आणि झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (sikandar raza) या खेळाडूंनाही नामांकन मिळालं आहे.






सूर्या टी20 रँकिंगमध्ये अव्वल


सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 Cricket) वर्चस्व गाजवत आहे. सध्याच्या आयसीसी टी20 क्रमवारीत ( ICC T20 Ranking) तो पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्याने यावर्षी भारतीय संघासाठी 31 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या आहेत. त्यानं वर्षभरात 2 शतकं आणि 9 अर्धशतकं ठोकली आहेत. त्यामुळे यंदाच्या टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 पुरस्कारासाठी त्याला नामांकित करण्यात आलं आहे.


सॅम करननं जिंकवला विश्वचषक


या नामांकनामध्ये इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम करन (sam curran) याचं नाव आहे. कारण त्याने वर्षभरात खासकरुन वर्ल्डकपमध्ये कमाल कामगिरी केली. टी विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मध्ये सॅम 'प्लेअर ऑफ द सीरीज' ठरला. त्याने 19  टी20 सामन्यांमध्ये 67 धावा करत तब्बल 25 विकेट्स घेतल्या.


सिकंदर रझानं झिम्बाब्वेला तारलं


यंदाच्या टी20 विश्वचषकात झिम्बाब्वे संघासाठी कमाल कामगिरी करणारा स्टार अष्टपैलू क्रिकेटर सिकंदर रझा सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एक स्टार खेळाडू म्हणून समोर येत आहे. त्यानेही वर्षभरात चांगली कामगिरी केल्याने त्याला या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. सिकंदरनं 24 सामन्यात तब्बल 735 धावा करत 25 विकेट्सही घेतल्या आहेत.


मोहम्मद रिझवान यावर्षीही कमाल फॉर्मात 


2021 वर्षात आपल्या फलंदाजीने कमाल करणारा पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यावर्षीही कमाल फॉर्मात होता. त्यामुळे त्याला देखील या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. त्याने यावर्षी 25 सामन्यात तब्बल 996 धावा केल्या आहेत. तसंच यष्टीरक्षक म्हणूनही त्याने कमाल कामगिरी करत 3 स्टम्पिंगसह 9 झेल घेतले आहेत.


हे देखील वाचा-