ICC Mens Test Cricketer of the Year 2022 nominees : यंदाच्या 2022 वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आयसीसी (ICC) करणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात अनेकांनी उत्तम खेळ दाखवला पण या सर्वांमधील 4 क्रिकेटर्सना 'आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' (ICC Mens Test Cricketer of the Year) च्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. या चौघांमध्ये इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचं नाव आहे. तर एकाही भारतीय खेळाडूचं मात्र या यादीत नाव नाही. तर नॉमिनीजचा विचार केल्यास इंग्लंडचा बेन स्टोक्स (Ben Stokes), इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), ऑस्ट्रेलियाचा उस्मान खाजा (Usman Khawaja) आणि दक्षिण आफ्रिकेटा कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना नामांकन मिळालं आहे.
बेन स्टोक्स
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) हा या पुरस्काराचा तगडा मानकरी आहे. नुकताच इंग्लंडला टी20 विश्वचषक जिंकवण्यात मोलाची कामगिरी निभावणाऱ्या बेनने त्याची जमेची बाजू असणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्येही दमदार खेळ दाखवला आहे. वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करत त्याने 15 सामन्यात 870 धावा करत 26 विकेट्स घेतल्या आहेत. एक कर्णधार म्हणून त्याने 9 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.
जॉनी बेअरस्टो
या नामांकनामध्ये इंग्लंडचा आणखी एक खेळाडू आहे. यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने ही नावाला साजेशी कामगिरी वर्षभरात केली. त्याने वर्षभरात 10 कसोटी सामने इंग्लंडसाठी खेळत यामध्ये 1061 रन केले आहेत.
उस्मान खाजा
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान खाजा (Usman Khawaja) याने देखील या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी केली. हजारहून अधिक धावा करणाऱ्या उस्मानला त्यामुळेच नामांकन मिळालं आहे. त्याने 11 सामन्यात संघाचं प्रतिनिधित्त्व करत या दरम्यान 1 हजार 80 धावा केल्या आहेत.
कागिसो रबाडा
तर दोन फलंदाजासह एका अष्टपैलू खेळाडूचं नाव असणाऱ्या या यादीत एक गोलंदाज ही आहे. हा गोलंदाज म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा. रबाडाने एकूण 9 विकेट्स घेत एकूण 47 विकेट्स नावावर केल्या. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला नामांकन मिळालं आहे.
हे देखील वाचा-